BUXONA

Monday, October 19, 2009

कुणावर इतकेही प्रेम करु नये


कुणावर इतकेही प्रेम करु नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी

तडकलेच जर ह्रुदय कधी

जोडताना असह्य वेदना व्हावी


डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे

एक दिवस अचानक त्या नावाचे

डायरीत येणे बन्द व्हावे


स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक

हातात आपल्या काहिच नसावे


कुणाला इतकाही वेळ देऊ नये

की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा

एक दिवस आरशासमोर आपनास

आपलाच चेहरा परका व्हावा


कुणाची इतकीही ओढ नसावी

की पदोपदि आपण त्याची वाट बघावी

आणि त्याची वात बघता बघता

आपलीच वाट दीशाहीन व्हावी


कुणाचे इतकेही ऐकू नये

की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा

आपल्या ओठांतुनही मग

त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा


कुणाची अशीही सोबत असू नये

की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी

ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने

डोळ्यात खळकन अश्रु जमावेत


कुणाला इतकीही माझी म्हनू नये

की त्याचे मीपण आपन विसरून जावे

त्या संभ्रमात त्याने आपल्याला

ठेच देऊन जागे करावे


पण.........
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे

दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जागीच घूमवेत

आपले शब्द जागीच घूमवेत...............

एक मैत्रिण आहे माझी...



एक मैत्रिण आहे माझी...

एक मैत्रिण आहे माझी...
माझ्या
सोबत हसणारी
मी
रडल्यावर मात्र...... माझे डोळे पुसणारी

एक
मैत्रिण आहे माझी...
नेहमी
सलवार-कमीज़ घालणारी
साधेपणा
तच सौंदर्य आहे.... हे सिद्ध करणारी,

एक
मैत्रिण आहे माझी...
हिशोबिपणे
वागणारी,
तिच्या
या सवयीमुळे.....माझे पैसे वाचवणारी,

एक
मैत्रिण आहे माझी...
कठोरतेने
वागणारी,
जरा
ओरडलो की मात्र..... मुसू मुसू रडणारी,

एक
मैत्रिण आहे माझी...
माझ्यावर
सारखी चिडणारी,
कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी,

एक
मैत्रिण आहे माझी...
सर्वाना
हवीहवीशी वाटणारी,
माझ्याशिवाय
मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी

प्रेमात पडलं की


प्रेमात पडलं की



प्रेमात पडलं की सारेच जण

कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.

यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात......

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे


एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे


तुझे ते टपोरे घारे डोळे

व गुलाबासारखे गाल

तुझे ते ओठ नशिले

आणि मस्तानी चाल

फ़क्त माझ्याच या नजरेणे तुलाच बघायचे आहे

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे


तुझे ते रेशमी केस

हलकेच हवेत उडत

तुला झुल्यात बसवण्यासाठी

मन माझे तडपडत

त्या स्वप्नाच्या झुल्यात
मला पण झुलायचे आहे

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे


तु जवळून माझ्या जाताना

येत असे सुगंधी वारा

मनात माझ्या बरसे
जणू
पावसाच्या धारा

त्या सुगंधी पावसात
तुझ्याच बरोबर भिजायच आहे

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच
आहे

होता असाच एक वेडा


होता असाच एक वेडा

होता असाच एक वेडा....
होता असाच एक वेडा.., माझ्यामागे फिरायचा..
वळून बघितला त्याच्याकडे, कि छानसा हसायचा...

रात्री फिरायला जाताना..मागे मागे यायचा..
वारयाची झुळूक बनून हळूच..मला स्पर्शून जायचा...

वाटलं, नशीब दिवसा तरी पिछा सुटला याचा..
पण तेव्हाही हळूच लपून तो माझ्याकडे बघायचा...

हिम्मत तरी किती त्याची..चक्क घरासमोर हिंडायचा!
सर्वांची नज़र त्याच्यावर असतानाही..तो आपल्या प्रेमाची ग्वाही द्यायचा..

न राहवून शेवटी एकदा..मी त्याला विचारले...
आणखी किती दिवस असे..करशील तू हे चाळे..?

म्हटले, किती दिवस असा तू..माझ्यामागे फिरशील..?
आणि किती दिवस माझ्याशी..असा प्रेमाने हसशील..?

म्हणाला, चाळे नसून हे प्रेम आहे माझ्या मनातले....
मला वाटते, तुला मात्र काहीच काळात नाही यातले..

ऐकून त्याचे हे बोलणे..मी खूप रागावले..
म्हटले, 'नाही कळत..आणि कळून घ्यायचेही नाही यातले..'

तो म्हणाला 'ठीक आहे'..पण- प्रेम मात्र मी तुझ्यावरच करेन..
जोपर्यंत हे विश्व राहील...मी तुझ्यासोबत असेन...

आणि हि गोष्ट त्याने खरी करून दाखवली..
खरच, त्या 'चंद्राने' अजूनही ..माझी साथ नाही सोडली..!!

मी ठीक आहे.........


मी ठीक आहे.........

हो, तू नाहीस म्हणुन
मन जरा अस्वस्थ आहे

होऊ दे त्याला काहीतरी

मी माझ्या कामात व्यस्त आहे

बाकि........ मी मस्त आहे ........


हो
, श्वासही कोंडतो कधी कधी
त्याच्यावारही एकतेपनाचा ताण आहे

होइल कधीतरी सरळ,
त्यालाही
वस्तुस्थितिचे भान आहे
बाकि, मी एकदम छान आहे .........


तू आठवण करून द्यायचिस
की
मला झोप येत आहे
आता नाही येत, नकोच ती!

भलत्या स्वप्नांवर ही मात आहे

बाकि, मी मजेत आहे ................


गालांवर, डोळ्यांच्या खालि,

ओलावा आहे, फार बोचरा आहे

पण असू दे, कारण त्याच्या प्रत्येक थेम्बात

तुझाच हसरा चेहरा आहे

म्हणुन मी तसा बरा आहे .............


मी कसा का असेना,
बोलुन चालून
एक विझलेली राख आहे
तू कशी आहेस ग??

बस्स, तेवढीच एक रुखरुख आहे

बाकि...... मी ठीक आहे

प्रेम करावे पण जरा जपून !!!!!


प्रेम करावे पण जरा जपून !!!!!

प्रेम करावे पण जरा जपून,,,,
असे सल्ले देणारे खूप भेटतात...

प्रेमात हि अगदी आधी तेच पडतात....


प्रेमात पडल्यावर स्वतःही पेक्षा जास्त,,,,

प्रेमाला जपावं लागतं,,,,

खरं तर स्वतःचा विचार करायला,,,

भानच कोणाला असतं...


प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,

इंद्र धनु सारखं रंगत...

आकाश हि कधी कधी,,,

गुलाबी भासायला लागतं..


प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,

जसं बहरूनच जातं...

काट्यातून चालतानाही,,,

फुलांनी स्पर्शल्या गत वाटतं...


अन् अचानक हे,,,

प्रेमच हरवलं तर,,,

सगळंच हरवून जातं...

श्वास चालू असतात हि,,,

पण जगणंच थांबून राहतं..


म्हणूनच म्हणतात,,,

प्रेम करावे तर जपूनच..

विश्वास ठेवावा
तो डोळे उघडूनच....